कश्या करू मी कविता आता
कसे रचू मी शब्द....
लिहाव तर खुप काही वाटत होत
सये तेव्हा.....
अस्तित्व होत तुझ
माझ्या जीवनात जेव्हा......
तू म्हणायचीस तेव्हा
माझ्यावर पण एखादी कविता कर ना
आता तर माझे शब्दच माझ्यावर रुसले.......
आठवणीत तुझ्या
चार शब्द कागदावर रचले........
पुढे लिहाव म्हटल पण..????
क्षणात सारे बोल कंठात येऊन दाटले......
डोळ्यातंन ओघळलेले अश्रू
टप टपा कागदावर टपकले......
अश्रुच्या धारेमध्ये लिहलेले
शब्द ही त्या सवे वाहून गेले.......
कारण.....??????
नियतीने माझे प्रेमच
माझ्या पासून हरवून नेले......
नियतीने माझे प्रेमच
माझ्या पासून हरवून नेले......
नविन कविता लिहायची
आहे तर शब्द मिळत नाही
आणि शब्द मिळाले तर
ते मांडता येत नाही
काय करायचं
डोक्यात अनेक विचार आहेत
पण त्या विचारांना
त्या शब्दांशिवाय तोड नाही
कधी एकांतात बसतो
तेव्हा काहीच सुचत नाही
जाणवते ते सुद्धा
एकटेपणाचे अस्तित्वं
जसा जीव टांगनीला लागला आहे
पण त्याचा ही काही उपयोग नाही
नविन कविता लिहायची
आहे तर शब्द मिळत नाही
आणि शब्द मिळाले तर
ते मांडता येत नाही
कधी कधी वाटतं...
तुझी वाट बघत मी
खिडकीत उभी असावी...
तुझ्या येण्याची चाहूल लागून सुद्धा
पाठमोरीच राहावी...
मोगऱ्याचा गजरा,
तू हळूच माझ्या केसात माळतांना
मीही तुझ्यासकट त्या मोगाऱ्या सारखीच दरवळावी....
तुझे हात माझ्या कमरे भवती
आणि तुझ्या श्वासांची कुजबुज माझ्या कानाला जाणवावी....
हळूच मग तू टेकवावेस ओठ माझ्या मानेवर....
मी शहारून मिठी मारत तुझ्यामधे गुंतून जावी....
अशी गुलाबी संध्याकाळ, सख्या एकदा तरी यावी....
कुणाचेच नसतात हक्क कुणावर पण... तरीही डोळे भरतातच ना ?
मुळात अपेक्षाच करु नये अशा पण.... तरीही आस लागतेच ना ?
हिशोब मांडायचा सारा तर आकडे पडतील कमी....,
तरीही सुख मोजताना पापण्या भिजतातच ना...???
लाख झाला असेल मनाचा दगड....,
तरीही आठवणींनी त्याला पाझर फुटतोच ना....??
जोडलेली नाती तुटताना मनात वेदना होतातच ना ...??
या सगळ्यातनं हाती उरायचे असते शून्य...फक्त एक शून्य..
पण..... तरीही जीव जडतातच ना .....??
मैत्री तुझी माझी
असावी फुलासारखी
शेवटपर्यंत सुगंध देणारी ,
तशीच ती फुलपाखरासारखी
मनसोक्त गंध लूटणारी ....!!I Love U.
मैत्री तुझी माझी
असावी पाखरासारखी
सतत मुखी राहणारी,
मुखी राहूणही
खुप काही बोलणारी ....!!I Love U.
मैत्री तुझी माझी
असावी धुक्यासारखी
क्षणापूरतीच गारवा देणारी ,
तशीच ती दवासारखी
अंगावर थंड पांगरूण जाणारी ....!!I Love U.
मैत्री तुझी माझी
असावी सावलीसारखी
सतत विसावा देणारी ,
तशीच ती मनाला
शांत करून जाणारी ..!!I Love U.
मैत्री तुझी माझी
अशीच असावी
सुखा दु:खात साथ देणारी
सुखात तुझी आसवे आसवीत
तर दु:खात माझे अश्रू आसवेत ....
नाही जमणार तुला माज्यावर प्रेम करायला
नाही जमणार तुला माज्यावर प्रेम करायला
जन्मोजन्मी वेड्यासारखी वात पाहायला
लाग आता लग्नासाठी मुलगा शोधायला
मलाच आहेर द्यावा लागेल
तुझ्या लग्नाला!
नाही जमणार तुला एकनिष्ठ राहायला
कदाचित लागेल तुला उष्टं खायला
कारणीभूत ठरेल जे प्रेम वाढायला
मलाच यावं लागेल तुझ्या लग्नाला!
नाही जमणार तुला माझं मन सांभाळणे
नाही सहन होणार तुला माझं रागावणं
नाही आवडणार कदाचित माझं विचित्र वागणं
बेधुंद बेदरकार बेफिकीर असणारं माझं
जगणं!