" भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो....!!! "
शुभ प्रभात...तुमचा दिवस शुभ जावो... :)
" संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं... पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं...!! कारण जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे..., समुद्र गाठायचा असेल..., तर खाचखळगे पार करावेच लागतील...!!!"
शुभ प्रभात...तुमचा दिवस शुभ जावो... :)
जीवन हे हास्य आणि अश्रू ,उन आणि छाया,
वारा आणि पाऊस,आनंद आणि दुखः,
प्रेम अणि द्वेष , राग आणि ममता ,
विचार आणि भावना यांचा एक सुरेख संगम आहे....
प्रत्येक दिवस हा सारखा नसतो ,प्रत्येक क्षण हा सारखा नसतो
कधी भरलेले आभाळ तर कधी लख्ख प्रकाश असतो
जेव्हा आपण कोणाकडे पाहून हसतो तेव्हा आपणास परत हास्यचं मिळते
हास्य, आनंद, समाधान या पेक्षा जगात दुसरे मुल्यवान काय आहे ?
प्रत्येक क्षण जगा भरभरुन जगा
म्हणून हसा आनंदी रहा समाधानी असा ..
शुभ सकाळ
सकारात्मक असा
रोज स्वतःला सांगा :
आजचा दिवस सुंदर आहे
मी रोज जे काही करतो किंवा माला वाटते
त्या पेक्षा मी बरेचं जास्त काही करु शकतो
नुसती काळजी आणि दुखः करुन काहीचं नाही होणार
मी स्वतःला झोकून प्रयत्न केले
तर मी नक्कीचं समाधानी होईल.
रोजचं असे क्षण असतात
जे आनंदाने भारलेले असतात
आज मी स्वतः आनंदी राहील
आणि इतरांनी ही आनंद देईल
जीवन सुंदर आहे आणि
मी ते अजून सुंदर करणार
आनंदाने जगणार.....
गोड माणसांच्या आठवणींनी...
आयुष्य कस गोड बनत...
दिवसाची सुरवात अशी गोड झाल्यावर..
नकळंत ओठांवर हास्य खुलत...
शुभ प्रभात .. शुभ दिवस...
" बोलताना जरा सांभाळून बोलावे... शब्दांना तलवारीसारखी धार असते.., फरक फक्त एवढाच कि...,तलवारीने मान...आणि शब्दांनी मन कापले जाते....!! "
शुभ प्रभात .. शुभ दिवस...